शिक्षक मतदारसंघ : दुपारपर्यंत 61 टक्के मतदान

0

नागपूर: विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक दुपारी 2 वाजेपर्यंत विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी ६०.४८ टक्के मतदान झाले असल्याने या सत्तारूढ आणि विरोधकांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.


जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर (५२.७५ टक्के),वर्धा (६७.०६ टक्के), चंद्रपूर (६९.०६ टक्के),भंडारा (६३.५८ टक्के),गोंदिया (५७.१८ टक्के), आणि गडचिरोली जिल्हा ६९.६०(सकाळी ७ ते १वाजेपर्यंत) याप्रमाणे आहे. दरम्यान, नागपूर विभागीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज अजनी चौकातील माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूलला आणि खामला चौकातील जुपिटर उच्च प्राथमिक शाळा (ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ) या मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा