इतिहासकार आहात की राजकारणी? हे आधी ठरवा!सुधीर मुनगंटीवार

0

पुणे : आपण इतिहासकार आहोत की राजकीय नेते, हे आधी ठरावे आणि ज्यांना इतिहासकार व्हायचे आहे, त्यांना जनतेने पुस्तके वाचण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी कोपरखळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) अजित पवार यांना लगावली. छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आपण कायम धर्मवीर संभाजी महाराज असाच ऐकत आलो आहेत, या शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा समाचार घेतला. सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. फेब्रुवारीपर्यंत सरकार कोसळणार, असे भाकित करणाऱ्या संजय राऊत यांचाही मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. सरकार फेब्रुवारीनंतर टिकल्यास संजय राऊत हे राज्यसभेचा राजीनामा देणार का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर असल्याचे दावे सुरु केेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुनगंटीवार यांनी सरकार फेब्रुवारीनंतरही टिकले तर राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का, असा सवाल त्यांना केलाय. संजय राऊत यांनी फेब्रुवारी तर जाऊ द्यावे पण पंधरा मार्चपर्यंत सर्व ताकद, शक्ती वापरावी. त्यानंतरही सरकार टिकले तर तुमचा बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा नकली आहे, असे म्हणत जनता तुमचा निषेध करेल, असेही मुनगंटीवार यांनी सुनावले.
दोन वर्षांच्या सत्ताकाळात महाविकास आघाडीने नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताची काय कामे केली, कोणते निर्णय घेतले, याची श्वेतपत्रिका काढून जाहीर करावे, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी यावेळी दिले

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा