“बालपणी मी संघाच्या शाखेत जायचो” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रेशीमबाग व दीक्षाभूमीवर

नागपूरः “रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती परिसर हे एक प्रेरणास्थान आहे. स्फूर्तीस्थान आहे. येथे नस्तमस्तक व्हायला मी आलो आहे. येथे आल्याचे समाधान आहे” असे नमूद करताना “लहानपणी मी संघाच्या शाखेत जायचो” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसराला भेट दिल्यावर बोलताना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्यासह संघाचे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघाचे पदाधिकारी विकास तेलंग यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या स्मृतींना अभिवादन केले. संघाचे स्थानिक पदाधिकारी व भाजपचे स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे एक प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान असल्याचे सांगितले. आपल्याला येेथे आल्याचे खूप समाधान आहे. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. बालपणी आपण संघाच्या शाखेत जात होतो, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा