बंगळुरु (Bangalore)- साऱ्या देशाचे लक्ष असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी मतदान (Karnataka Assembly Election Voting) सुरु झाले असून कर्नाटकमधील 224 जागांवर 2614 उमेदवार रिंगणात आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल होत आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यात सरासरी २० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये मुख्य मुकाबला सत्तारूढ (BJP)भाजप, (Congress)काँग्रेस व जनता दल सेक्युलर (Janata Dal Secular) या तीन प्रमुख पक्षांमध्ये आहे. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi )पक्षाच्या बड्या नेत्यांनी 450 हून अधिक सभा घेतल्या आहेत तसेच 100 हून अधिक रोड शो केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटकात राहिले. तर राहुल, प्रियांका आणि सोनिया यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि ४० टक्के कमिशन या मुद्यांवर प्रचार केला तर भाजपने बजरंगबली, बजरंग दल, दहशतवाद हा मुद्दा बनवला.
मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. सेलिब्रिटी मंडळी देखील केंद्रावर पोहोचत आहेत.(Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगळुरूच्या विजयनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. येडियुरप्पा यांनी मतदान करण्यापूर्वी शिकारीपुरा येथील हुच्चराया स्वामी मंदिर आणि राघवेंद्र स्वामी मठात दर्शन घेतले. अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj)यांनी शांतीनगर येथील सेंट जोसेफ इंडियन स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
त्रिशंकू स्थिती?
राज्यात भाजप, काँग्रेस, जेडीएस यापैकी कोणालाही एकट्याने बहुमत मिळणार नाही, असे संकेत निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून मिळाले आहेत. जेडीएसने भाजपसोबत जाण्याची तयारी केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर जेडीएसने कोणत्याही पक्षासोबत युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यातील 17 टक्के लिंगायत आणि 14 टक्के विक्कालिंग, न 32 टक्के अनुसुचित जाती आणि 17 टक्के मुस्लिम मतदार आहेत.