Sanjay Raut “तुम्हीही बोलण्याची हिंमत ठेवा..”,.. राऊतांचा पवारांवर पलटवार

0

मुंबई (Mumbai): ठाकरे गट आणि शरद पवार यांच्यातील युद्ध सुरुच आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut )यांनी पवारांवर पलटवार केलाय. “ शरद पवारांसोबत कुणी नव्हते, तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली. आता तुमच्याकडे काही असेल, तर बोलण्याची हिंमत ठेवा”, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (Sanjay Raut on Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांना दिला. संजय राऊत म्हणाले की, “सामनाला महत्त्व द्या, असे मी कुठे म्हणतो. मी माझ्या पक्षाचे म्हणणे मांडत असतो. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. गेली 40 वर्षे आम्ही राजकीय भाष्य करत आहोत, याची जाणीव ठेवा”, असेही ते पवारांना उद्देशून म्हणाले.

“जर त्यांना काही चुकीचे वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडावी. आम्ही त्यांना कुठे रोखले आहे. मी माझा पक्ष, राज्य आणि देशाविषयी बोलतो. यात त्यांचे पोट दुखण्याचे कारण नाही,” असेही राऊत म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद न्यायालयात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. विधानसभाध्यक्ष्य राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar)  यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला, अशा नरहरी झिरवळ यांच्याकडेच हे प्रकरण गेले पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजपचा दारूण पराभव होणार आहे. हा पंतप्रधानांचा पराभव असेल, असा दावाही त्यांनी केला.