बाबा डवरे यांचा 21 रोजी ना गडकरींच्या हस्ते सत्कार सत्कार

0

नागपूर : शहरातील झुंजार व्यक्तिमत्त्वाचे धनी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा डवरे यांचा येत्या 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने विदर्भ गौरव प्रतिष्ठान तर्फे सत्कार केला जाणार आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ नितीन राऊत तर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, आमदार विकास ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.ना नितीन गडकरी यांच्या निवासस्थान परिसरात हॉटेल रेडिसन ब्लू च्या शेजारी वर्धा रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी, प्रेम लुनावत, प्रगती पाटील, डॉ सागर खादीवाला ,बाळ कुलकर्णी, मोहम्मद जहीर,प्रफुल्ल गाडगे, जाधव, अतुल दुरुगकर,निलेश खांडेकर, अनिल आदमने व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा