संजय भाकरे फाउंडेशनचे ‘मोक्षदाह ‘शनिवारी

0

नागपूर : संजय भाकरे फाउंडेशन प्रस्तुत अनिता भाकरे यांची प्रस्तुती असलेले मोक्षदाह हे नाटक विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि विष्णूकी रसोई यांच्या वतीने 21 जानेवारी रोजी शंकर नगर येथील साई सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता दाखवले जाणार आहे. प्रवेश निशुल्क असणार आहे. आयुष्य आणि मृत्यूकडे सकारात्मकतेने बघणारे हे नाटक असून 61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा 2022 मध्ये रसिकांनी गौरवलेले तृतीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्राप्त हे नाटक असून यावेळी डॉ सोमनाथ सोनवलकर लेखक,ऍड अजय घारे दिग्दर्शक आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित राहणार आहेत.