Home Top News 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – आमदार बच्चू कडू

20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – आमदार बच्चू कडू

0

 

अमरावती : काल सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान करत येत्या 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी प्रतिक्रिया दिली. कडू म्हणाले,आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे कुणाला कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्र्यांकडे चार ते पाच खात्यांचा पदभार आहे. गोंधळलेली अवस्था आहे त्यामुळे लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे मला एकनाथ शिंदे यांनी मंत्री पद देण्याच आश्वासन दिलं होतं.एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहे ते शब्द पाळणार.विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.