बागेश्वर धामने स्वीकारले अंनिसचे आव्हान

0

पैसे न घेता करणार शंका समाधान


नागपूर (nagpur) :   धीरेंद्र महाराज (Dhirendra Maharaj of Bageshwar Dham) आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत (Andha Shradha nirmulan Samiti) सुरू असलेले वाकयुद्धा आणि आव्हान- प्रतिक्रियांना चे सत्र एव्हाना टोकाला पोहोचले आहे. अंनिसचे संस्थपक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांच्या कथित दिव्यशक्तीला आव्हान देत चमत्कार सिद्ध करा आणि ३० लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. या आव्हानानंतर धीरेंद्र महाराज यांची रेशीमबाग (Reshimbag) मैदानावर सुरू असलेली प्रवचनमाला संपली. यामुळे धीरेंद्र महाराज ( Dhirendra Maharaj)  यांनी पळ काढण्याचा दावावजा आरोप अंनिसने केला होता. त्यानंतर बुधवारी श्याम मानव यांचे दिव्यशक्तीचा भांडाफोड विषयावर व्याख्यान झाले. या वादात अंनिस पुढे निघताना दिसत असतानाच आता धीरेंद्र महाराज यांनी अंनिसचे आव्हान स्वीकारले आहे. आम्हाला ३० लाख नको, पण आपले पूर्ण समाधान करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

समितीच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. पण, त्यासाठी समितीच्या प्रतिनिधींना रायपूरला यावे लागेल असं म्हणत २० आणि २१ जानेवारीला रायपूर येथे होणाऱ्या दरबारात पोहोचण्याची सूचना त्यांनी केली आहे. समितीचे सदस्य येणार असतील तर त्यांचा येण्या- जाण्याचा खर्च बागेश्वर सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे. दोन्ही पक्षांकडून सुरू असलेले दावे-प्रतिदावे पाहता हा वाद निकटच्या काळात तरी थांबताना दिसत नाही.
काय आहे नेमके प्रकरण?

अलीकडेच धीरेंद्र महाराज यांची प्रवचनमाला रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान दोन दिवस त्यांचा दरबारही भरविला गेला. त्यात ते लोकांना नावाने हाक मारून त्यांच्या कष्टाचे निवारण करीत असल्याचा दावा आयोजकांकडून केला गेला होता. या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप नोंदविला होता. श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेत धीरेंद्र महाराज यांना दिव्यत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. प्रारंभी महाराजांची प्रवचनमाला ५ ते १३ जानेवारी दरम्यान होणार असल्याचे सांगितले गेले होते. पण, अंनिसच्या आक्षेपानंतर ११ लाच प्रवचनमालेचा समारोप झाला. त्यांनी पळ काढल्याचा दावा समितीने केला. पण, आयोजकांनी मात्र पूर्वी नियोजित कार्यक्रम ११ पर्यंतच असल्याचा दावा केला होता. महाराज निघून गेल्याने हे प्रकरण शांत होईल, असे वाटत असतानाच अंनिसकडून सातत्याने आरोप केले जात असल्याने धीरेंद्र महाराज स्वतःच समोर आले. त्यांनी समितीचे आव्हान स्वीकारले आहे.