Home Artical Blog ‘माता भिमाई आंबेडकर’ संशोधन प्रकल्पासाठी ‘बार्टी’ कडून माहिती देण्याचे आवाहन

‘माता भिमाई आंबेडकर’ संशोधन प्रकल्पासाठी ‘बार्टी’ कडून माहिती देण्याचे आवाहन

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी

नागपूर(Nagpur), दिनांक: ०५ एप्रिल २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठी “माता भिमाई आंबेडकर: जीवन संघर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीतील योगदान – एक अभ्यास” या शीर्षकाचा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या संशोधन प्रकल्पाची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी बार्टी संस्थेच्या संशोधन विभागामार्फत समाजातील विविध घटकांकडून माहिती मागवण्यात येत आहे. या विषयाबाबत माहिती असणारे संशोधक, अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपल्याकडे असलेली माहिती उदा. मौखिक माहिती, कागदपत्रे, लेख, शोधनिबंध, ग्रंथ इत्यादी उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित माहिती ३१ मे पर्यंत बार्टी संशोधन विभागाच्या researchbarti2022@gmail.com या ई-मेलवर अथवा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१’ या पत्त्यावर टपालाने पाठवता येईल. तसेच, ही माहिती प्रत्यक्ष कार्यालयात येऊनही सादर करता येईल. आपण उपलब्ध करून दिलेली माहिती योग्य संदर्भासह या प्रकल्पामध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट केली जाईल.
या प्रक्रियेसाठी येणारा झेरॉक्स, टपाल, प्रवासभाडे किंवा इतर कोणताही खर्च संस्थेमार्फत दिला जाणार नाही. जास्तीत जास्त अभ्यासकांनी या महत्त्वपूर्ण कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन बार्टी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सा. प्रकल्प व्यवस्थापक
बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर