अकोला : अकोला रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोहमार्ग कोळशाच्या 2 डब्याला आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. ही मालगाडी नागपूर ते भुसावळ लोहमार्गवर भुसावळ पावर हाऊसला जात होती. गाडी रोलिंग मध्ये सुरू असताना इंजीन पासून 16 नंबरच्या बोगीमधून धूर निघताना रेल्वे गार्ड राकेश जाधव यांच्या निदर्शनास आले. यावेळी जाधव यांनी समय सूचकता दाखवत गाडी अकोला रेल्वे स्थानक मेन लाईनला उभी केली व स्टेशन मास्तर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अकोला अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोगीवर पाणी टाकून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.