नागपूर :स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, जेष्ठ विचारवंत, साहित्यिक व कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त महावितरणर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाt प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरिश गजबे, राजेश नाईक, अशोक सावंत, कार्यकारी अभियंते सर्वश्री समिर शेंद्रे, दिपक आगाव, चंदन तल्लरवार, राजेंद्र गिरी, श्रीमती दिपाली माडेलवार यांचेसह महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांतील अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.