खबरदार! मोदींवर आरोप कराल तर … सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

0

मुंबईः “नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. २३ कोटी मतदारांनी त्यांना निवडून दिलेय. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान झालेले नाहीत. पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणणे सहन करणार नाही”, या शब्दात राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Forest Minister Sudhir Mungantiwar)विरोधकांना ठणकावून सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या मुद्यावर शुक्रवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. काँग्रेसने या प्रकरणी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवत सभागृहात ‘मोदी चोर है’ ची नारेबाजी केली. त्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
या मुद्यावर विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर यासंदर्भात शनिवारी सकाळी निकाल देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला सांगितले. मात्र, त्यावरून समाधान न झाल्यामुळे सभागृहात गदारोळ कायम राहिला. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संतप्त होत पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या विरोधकांना ठणकावून सांगितले.

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर शरसंधान साधले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्यावरून विरोधकांना सुनावले. शिंदे म्हणाले. “विधीमंडळाच्या आवारात जे काही घडले, त्याचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु ज्या लोकांनी गेल्या आठ महिन्यांपासून आमचा (शिंदे गटातील आमदार) अपमान केला ते योग्य होते का? आमचे फोटो लावून खोके, मिंधे म्हणणे कुठल्या आचारसंहितेत बसते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा