भंडारा : बपेरा, वाहणीत 8.23 कोटींचा धान घोटाळा; 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

भंडारा २१ मे  भंडारा जिल्ह्यात धान खरेदी घोटाळा थांबता थांबत नाही आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा, वाहणी या दोन आधारभूत धान खरेदी केंद्र चालकांनी खरेदी न करता बोगस 7/12 नोंद करत शासनाची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. त्यामुळे दोन्ही संस्थेतील 26 जणांवर सिहोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा हा धानाचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणुन शासनाने आधारभूत खरेदी केंद्र सुरू केलं पण संस्थाचालक स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची दिशाभूल करून ज्या शेतकऱ्यांकडे धान नाही. अशा शेतकऱ्यांचे 7/12 नोंदवून शासनाकडून लाखो रुपयांची उचल करत आहे. जेव्हा शासनाला धान देण्याची वेळ येते तेव्हा यांच्याकडून धान दिला जात नाही. असाच प्रकार बपेरा, वाहनी येथिल दोन संस्थेने केला आहे. त्यामूळे याची चौकशी करून दोन्ही संस्थेच्या 26 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेने 8 कोटी 23 लाखांचा घोटाळा केल्याचे आढळून आले असून चौकशी पूर्ण झाल्यावर संस्थेच्या संचालकांना अटक करण्यात येणार आहे.