भाजप २४० जागा लढविणार…

0

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत संभाव्य जागावाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President chandrashekhar bawankule) यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून त्यातून आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहे, त्यामुळे कामाला लागा… रात्र-रात्र काम करावे लागणार आहे”, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केल्याचे बोलले जात असून त्यातून शिंदे गटाची कमी जागांवर बोळवण होणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपने विधानसभेच्या 240 जागा लढविल्यास केवळ 48 जागाच शिल्लक राहात असून त्या शिंदे गटासाठी राहणार, असा अर्थ बावनकुळे यांच्या विधानातून काढण्यात येतोय. तर यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागण्याच्या दृष्टीने ते व्यक्तव्य केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळीच जागावाटपाचा विचार होणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या सोशल मीडियाच प्रमुखांची आणि प्रवक्त्यांची कार्यशाळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. या कार्यशाळेत बोलताना बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य जागा वाटपाचे संकेत दिले. बावनकुळे म्हणाले की, “ आपले 150-170 निवडून येतील पण आपण 240 जागा लढण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेंकडे पन्नासच्या वर कुणी नाही.”
बावनकुळे यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजप काहीसा बॅकफूटवर गेलाय. त्यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा आणखी जागा शिंदे गटाकडे जातील तसेच त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल, असेही बावनकुळे म्हणाले. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी ते वक्तव्य केल्याचे बावनकुळे म्हणाले. अद्याप शिंदे गटाकडून त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः बावनकुळे यांचे वक्तव्य ठाकरे