Home Top News सोलर एक्स्प्लोसिव्हमध्ये स्फोट, ९ कामगार मृत्यूमुखी

सोलर एक्स्प्लोसिव्हमध्ये स्फोट, ९ कामगार मृत्यूमुखी

0

नागपूर  NAGPUR : अमरावती मार्गावर BAJARGAO बाजारगाव येथीळ सोलर एक्स्पोसिव्ह Solar expository  कंपनीत झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. मृत कामगारांमध्ये ६ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. या कंपनीत स्फोटके तयार केली जातात. या घटनेत अनेक मजुरही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाला. कंपनीत तयार झालेल्या स्फोटकांच्या पॅकिंगचे काम सुरु असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता. त्यामुळे काही कामगार घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.

नागपूर स्फोटातील मृतांना पाच लाखांची मदत- फडणवीस

नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्कात आहेत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असं ट्वीट फडणवीसांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

नागपूर:- नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन , पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.