जिल्हा परिषद कृषी विभागाची कारवाई, तेलंगणाच्या एका आरोपीला अटक
शेतीचा हंगाम एन जोमात आला आहे. असे असतांना राज्यात प्रतिबंधित चोर बिटी कापूस बियाण्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे. (Chandrapur)चंद्रपूर जिल्ह्यात (Telangana)तेलंगणा सिमेवर असलेल्या (Gondpipari Taluka)गोंडपिपरी तालुक्यात ( Dhaba village)धाबा गावात एका तेलंगणातील व्यक्तीवर कृषी विभागाच्या कारवाईने एकच खळबड उडाली आहे.पहाटे ५ वाजताच कृषी विभागाचे अधिकारी व त्यांची चमू गावात दाखल झाली. दरम्यान ३ संशयितांच्या घराची झडती घेण्यात आले. यातील आरोपीचे नाव (Koteswarrao Chilukuri)कोटेश्वरराव चिलुकुरी आहे. तो तेलंगणातील रहिवासी असून धाबा गावात वास्तव्याला आहे. कारवाईने चोर बिटी विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून आरोपीवर धाबा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जप्त १७ किलो चोर बीटी बियाण्यांची किंमत 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढच्या काळातही सीमावर्ती भागात बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग नजर ठेवणार आहे.