नोकरीसाठी बोलावले, गुंगीचे औषध देत रिसॉर्टवर दोघांनी केला बलात्कार

0

(Nagpur) नागपूर : मध्यप्रदेशात राहणाऱ्या एका गरजू महिलेला नोकरी करण्यासाठी नागपुरात बोलावले. मित्रांसोबत तिला रिसॉर्टवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून दोन आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळी शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Ratnadeep Gajbhiye)रत्नदीप ऊर्फ पिंटू गजभिये (३९), रा. रमना मारोती आणि (Karthik Chaudhary) कार्तिक चौधरी (५०), रा.(Binaki layout) बिनाकी लेआऊट अशी अटकेतील या आरोपींची नावे आहेत. 32 वर्षीय ही घटस्फोटित महिला मध्यप्रदेशच्या सिहोरमध्ये राहणारी असून तिला दोन मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर पिंटूशी तिची मैत्री झाली.

तेव्हापासून दोघांमध्ये चॅटिंग सुरू होती. ही महिला नोकरीच्या शोधात होती. पिंटूने तिला नागपुरात नोकरी असल्याचे सांगितले.२१ जूनला ही महिला बसने मध्यप्रदेश बसस्थानकावर आली. पिंटू आणि कार्तिकने तिला नोकरीसाठी कार्यालयात घेऊन जात असल्याचा बहाणा केला. मायर संधी साधून रस्त्यात शीतपेयामध्ये गुंगीचे औषध तिला पाजले. त्यानंतर या महिलेला दोघेही उमरेड मार्गावर डोंगरगाव परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. बेशुद्धावस्थेत दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येताच तिने जाब विचारला असता पिंटूने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला दिघोरीमध्ये एका मैत्रिणीच्या घरी सोडून ते दोघे पसार झाले. आपल्यावरील अत्याचाराविरोधात महिलेने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.