शिक्षण संस्‍थांचे ‘आर्थिक नियोजन’ वर विचारमंथन 9 एप्रिल रोजी

0

नागपूर, 3 एप्रिल 2023
विद्या भारती विदर्भ नागपूर महानगर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्था संचालकांसाठी ‘आर्थिक नियोजन विचारमंथन’ यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ दरम्‍यान श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, गांधी गेट, महाल येथे होणार आहे.

आयकर कलम 80G आणि फॉर्म 12 A यावर सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट नरेश जखोटीया मार्गदर्शन करतील. शिक्षण संस्‍था चालकांनी मोठ्या संख्‍येने संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन विद्या भारती नागपूर महानगर अध्यक्ष शैलेंद्र मानावत, महानगर मंत्री संदीप पंचभाई, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सचिव रवींद्र फडणवीस व कार्यक्रम संयोजक सुबोध आष्टीकर यांनी केले आहे.