Nana Patole राष्ट्रपती राजवट आणा – नाना पटोले

0

मुंबई Mumbai  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात सध्याची परिस्थिती चांगली नसून महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आले. मात्र, १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आली आहे, असे पटोले म्हणाले. State president of Congress Nana Patole has demanded that President’s rule should be implemented in the state. The current situation in the state is not good and the Maharashtra government has nothing to do with the people’s issues. BJP came to power by making big promises to the people. However, the people of Maharashtra have realized the mistake of electing 105 MLAs, said Patole. 

भाजपने महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न करता ईडीची भिती दाखवून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. मलाईदार खात्यांसाठी खातेवाटप रखडला आहे. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पटोले यांनी केली. राज्यात बेरोजगारी आहे. असंख्य जागा रिक्त असताना त्या भरून काढण्यासाठी निवृत्त शिक्षकांची करार पद्धतीवर नियुक्ती करण्याचा सुलतानी जीआर सरकारने काढला असून हा निर्णय बेरोजगार तरुणांवर आघात करणारा असल्याचे पटोले म्हणाले.