– दोन्ही बाजूने निलंबनाची मागणी, तापणार वातावरण
नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सभा अतिशय वादळी ठरली.काँग्रेसचे बंडखोर सदस्य ज्ञानेश्वर उर्फ नाना कंभाले यांनी समाज कल्याणच्या विविध योजना संदर्भात अतिरिक्त 1 कोटी रुपयांची तरतूद का, यावर आक्षेप घेतल्याने वातावरण तापले. सभापती मिलिंद सुटे यांनी हा समितीचा अधिकार आहे आम्ही ठरवू ते होईल असे सांगितल्याने यात अधिक भर पडली. खंबाले यांनी जिप कुणाच्या बापाची नाही तर जनतेची आहे असा इशारा देत हातातील कागदपत्रे, फाईल भिरकावत ते निघून गेले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण जोध यांनी पाण्याची बॉटल भिरकावली. दरम्यान कंभाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तालयाला पाठवावा असे निर्देश जिप अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी प्रशासनाला दिले तर दुसरीकडे आपल्यावर निलंबन कारवाई होत असेल तर सभापतींच्या मनमानी विरोधात त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी कंभाले यांनी केली आहे. या मागणीसाठी कंभाले यांच्या मदतीने विरोधक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना भेटणार असल्याचे कळते.एकंदरीत जि प चे वातावरण पुढील काही दिवस तापलेले राहणार आहे.