नागरिकांमध्ये तीव्र रोष : मनसेचे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन
वाडी. औद्योगीक क्षेत्रालगत असलेल्या वाडी शहराचा (Wadi city) झपाट्याने विस्तार होतो आहे. दिवसेंदिवस वस्त्या आणि लोकसंख्याही वाढते आहे. त्या तुलनेत विकासकामांना गती येऊ शकली नाही. परिणामी शहरात समस्यांचा डोंगर निर्णाण झाला (mountain of problems) नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये रोष व्याप्त आहे. वाडीतील विविध समस्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena ) आक्रमक भूमिका घेतली आहे. वाडीतील विविध समस्यांसंदर्भात शुक्रवारी मनसेच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्याकडे निवेदन सोपवून समस्या सोडविण्याची मागणी केली. प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारासुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे. रस्ते, अस्ताव्यास्त वाहतूक, पार्किंचा प्रश्न, वार्ड क्रमांक 2 मधील मंगलधाम सोसायटीतील दानाची दूरवस्था आदी प्रश्न प्राधान्य सोडविण्याची मनसेची मागणी आहे.
मंगलधाम सोसायटीतील मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, शिवाजीनगरात मलवाहिनीची व्यवस्था करण्याता यावी, वाडीतील सर्व रेस्टॉरंट, बार आणी हॉटेल्ससमोर पार्किंगची व्यवस्था नाही. येथे येणारे ग्राहक थेट रस्त्यांवर पार्क करतात. यामुळे वाहतुकीला बाधा निर्माण होते आहे. याच प्रकारातून अपघाताच्या घटना वाढल्या असून अनेकदा भांडणाचे प्रसंगसुद्धा ओढावले जात आहेत. वार्ड क्रमांक 2 अंतर्गत रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. शिवाजी नगर, कंट्रोल वाडी, वार्ड नंबर 3 मध्ये अनाधिकृत बांधकाम झाले आहे. स्वच्छताच होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. आदी प्रश्नांकडेही मनसेने निवेदनातून लक्ष वेधले आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष दीपक ठाकरे, तालुका संघटक महेश शाहू, तालुका उपाध्यक्ष राकेश चौधरी, धनराज गिरीपुंजे, नितीन पिटोरे, मुकेश मुंडेले, आकाश बाबर, अजिंक्य वाघमारे,प्रीतम कांपल्लिवार, सोमेश येडे, भोला सोनटक्के, गौरीशंकर मेश्राम, दिलीप गोंडेकर, सतीश चौधरी, आदित्य राऊत, पुष्पकांत मेश्राम, त्याचप्रमाणे महिला सेनेच्या अर्चना संजय ठाकरे, शशिकला सुनील बोंदरे, चंदा प्रकाश गोंडाणे, उमा वानखेडे, आरती श्याम तराळे, आशा अशोक कटरे, अर्चना दीपक हेडाऊ आदींचा समावेश होता.