Home MAHARASHTRA किल्ले शिवनेरीसाठी पीएमपीकडून बस सुविधा

किल्ले शिवनेरीसाठी पीएमपीकडून बस सुविधा

0

(Pune)पुणे 16 फेब्रुवारी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या दि. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांत ही सेवा उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.किल्ले शिवनेरीवर दि. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी पुण्यासह अन्य जिल्हे आणि पररज्यातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर येत असतात. त्यामुळे शिवजयंतीच्या दोन दिवस आधीपासून गडावर शिवभक्तांची गर्दी होते. या शिवभक्तांसाठी पीएमपीकडून तीन दिवस विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

भोसरी बसस्थानकातून या सर्व बस जुन्नरसाठी सुटतील, प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.भोसरी ते जुन्नर बस सुटण्याच्या वेळा : सकाळी ०५.३०, ०७.००, ०८.३०, १०.००, दुपारी ०१.३०, ०३.००, ०४.३०, सायंकाळी ०६.०० (शेवटची बस)

जुन्नर ते भोसरी बस सुटण्याच्या वेळा : सकाळी ०९.३०, ११.००, दुपारी १२.३०, ०२.००, सायंकाळी ०५.३०, ०७.००, ०८.३०, रात्री १०.०० (शेवटची बस)