उत्तरप्रदेशात 4 टाईम बॉम्बसह आरोपीला अटक

0

(Merath)मेरठ, 16 फेब्रुवारी : (Uttar Pradesh)उत्तरप्रदेशातील मुजफ्फरपूर येथे पोलिसांनी 4 टाईम बॉम्बसह एका आरोपीला अटक केलीय. जावेद असे आरोपीचे नाव असून तो मुजफ्फरपूरच्या खालापार परिसरातील रहिवासी आहे. मेरठ येथील स्पेशल सास्क फोर्सने (एसटीएफ) ही कारवाई केलीय.

एसटीएफच्या मेरठ युनिटने आज, शुक्रवारी सकाळी मुझफ्फरनगरच्या खालापार भागातून आरोपी जावेदला अटक केली असून त्याच्याकडून 4 टाईम बॉटल बॉम्ब (आयईडी) जप्त केले आहेत. एसटीएफचे पथक आरोपींची करीत असून, हे बॉम्ब कोणत्यातरी नियोजित कटात वापरले जाणार होते. एसटीएफचे पोलिस अधीक्षक ब्रिजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार आरोपी जावेद हा पूर्वी रेडिओ रिपेअरिंगचे काम करीत असे. तरआरोपी जावेदचे आजोबा फाटाके बनवायचे. त्यांच्याकडूनच जावेदने बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. जावेदचा मामा नेपळला वास्तव्यास असून त्याचे नेपाळला येणेजाणे आहे. जावेदने आईडी बॉम्ब कसा बनवायचे याची माहिती युट्यूबच्या माध्यमातून मिळवली होती. खालापार परिसरातील महिलेने जावेदला हे बॉम्ब तयार करण्याचा ऑर्डर दिला होता असे त्याने चौकशीत कबुल केलेय. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून लवकरच यासंदर्भात अधिक खुलासे होतील असे एसटीएफच्या ब्रिजेश कुमार सिंग यांनी सांगितले.