
सेवाग्राम : वर्धाहून करंजी भोगे मार्गे भाणखेडा पर्यंत बस 25 वर्षांनंतर पोहचल्याने पूजई येथे गावकऱ्यांनी बस चालक आणि वाहनांचे जंगी स्वागत केले. तर या कार्याला आमदार राजेश बकाने यांनी केलेल्या पाठविण्यासाठी त्यांचे आभार मानले.
वर्धा ते भानखेडा बस गेल्या 25 वर्षापासून बंद झाली होती त्यामुळे करंजी भोगे, सोंडलापूर, पूजई, भानखेडा मार्गावरील विद्यार्थी, तसेच चाकरमानी यांना वर्ध्यात येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या मार्गावरील गावातील नागरिकांनी पूजई येथील अतुल देशमुख यांनी आमदार राजेश बकाने यांना बस सुरू करण्याची मागणी केली. आमदार राजेश बकाने यांनी परिवहन महामंडळाशी पाठपुरावा करून आज सकाळी बस गावात पोहचली त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
आज 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10वाजता पूजई गावात बस पोहचताच अतुल देशमुख यांनी बस चालक आणि महिला वाहक यांचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक गजानन राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासात सुरुवात झाली.
यावेळी प्रकाश राऊत, अरविंद राऊत, गौतमरावजी शेंद्रे, मनोहर खऊट, शंकर ठाकरे, नानाजी राऊत,ज्ञानेश्वर कोकाटे, अरुणराव वाटकर, वसंतराव राऊत, मारोतराव वानखेडे, दिलीप शेगोकर, गोविंदराव शेलकर, समीर ठाकरे, आकाश वाटकर, शरदराव देशमुख, बंडू नागपुरे, उमेश भुमले, मारुती देशमुख, भीमराव भोसले, शंकरराव नेहारे, वसंतराव खउट, पद्माकर चौधरी, मुरलीधर बोंबले,विजय अंडरस्कर, राजेश कोरडे, शंकरराव मेंढे, वसंतराव शिरसागर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक प्रमुख उपस्थिती होते.














