मंत्रिमंडळ विस्तार ८-१० दिवसांत, आमदार शिरसाटांचा दावा

0

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निवाड्यात शिंदे गटाला दिलासा मिळाल्यावर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झालीय. येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Cabinet Expansion likely in 8-10 days) यांनी केलाय. मंत्रिमंडळ विस्तारात दोन्ही पक्ष मिळून एकूण वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असा दावाही त्यांनी केलाय. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आज आमदार शिरसाट यांनी याबाबत खात्रीशीर दावा केला.

 

 

आमदार शिरसाट यांनी अजित पवारांवर देखील यावेळी भाष्य केले. अजित पवारांना २०१९ पासूनच भाजपमध्ये जायचे होते, असा दावा शिरसाटांनी केलाय. शिरसाट म्हणाले की, 2019 ची निवडणूक आम्ही युतीत लढलो होते. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर सारे मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळीच आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. पण, शिवसेनेने भाजपसोबतच जायला हवे, असे आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे होते, असे शिरसाट म्हणाले. अजित पवार हे देखील आधीपासूनच भाजपसोबत जायला तयार होते, असे शिरसाट म्हणाले.