मुंबईः विरोधी पक्ष जिंकत नसून सत्ताधारी पक्षाचा पराभव होत असतो. भाजपचा हा पराभव त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपले कोणीच काही वाकडे करु शकत नाही, अशा विचारांचा पराभव आहे, असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपवर केली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराभवावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. सर्वांनी या निकालातून बोध घ्यावा, जनतेला कधीही गृहीत धरु नका, असेही राज ठाकरे म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जे घवघवीत यश मिळाले, तो राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याचे मतही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
कर्नाटकमधील निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ती कर्नाटक राज्याची निवडणूक होती. महाराष्ट्रात किंवा लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम होतील की नाही, हे आताच सांगता येणार नाही