१७, १८ एप्रिलला आयोजन : विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी
नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सोमवार १७ व मंगळवार, १८ एप्रिल रोजी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग सिव्हिल लाईन नागपूर येथे सकाळी १०.३० वाजेपासून कॅम्पस मुलाखती होणार आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी असलेले विद्यार्थी या पदांकरिता अर्ज करू शकतात. मिहान येथील हेक्सावेअर या कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व सीनियर एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता तर टेलीपरफॉर्मन्स या कंपनीकडून कस्टमर सर्विस असोसिएट्स या पदाकरिता या मुलाखती घेण्यात येत आहेत. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
मिहान येथील हेक्सावेअर या कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व सीनियर एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता सोमवारी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मुलाखतीचे आयोजन केले आहे. कंपनीकडून ग्राहक सेवा सदरातील नोकरी करीता मुलाखती घेतल्या जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर / पदवी पूर्व शिक्षण घेतलेले विद्यार्थी या पदांकरिता मुलाखती देऊ शकतात. अनुभवी त्याचप्रमाणे नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. या पदांकरिता ३ ते ४ लाखाचे वार्षिक पॅकेज कंपनीकडून दिले जाणार आहे. याकरिता इंग्रजी भाषेतील उत्तम जाण असण्याचे कौशल्य आवश्यक आहे.
याच प्रमाणे टेलीपरफॉर्मन्स या कंपनीकडून सोमवार, १७ व मंगळवार १८ एप्रिल या दोन दिवस सकाळी १०.३० वाजता कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले आहे. कस्टमर सर्विस असोसिएट्स या पदाकरिता मुलाखती होत असून वार्षिक १.८ ते ४ लाख रुपयांचे पॅकेज या पदाकरिता दिले जाणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षेत 50 टक्के पेक्षा जास्त गुण तसेच पदवी / पदव्युत्तर पदवी असलेले विद्यार्थी या पदाकरिता अर्ज करू शकतात. या दोन्ही प्लेसमेंट कॅम्पस ड्राईव्हचा लाभ घेण्याचे आवाहन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. भूषण महाजन यांनी केले आहे.