हत्याकांडानंतर साखरखेड्यात तणावाची स्थिती

0

संतप्त जमावाची पोलिस ठाण्यावर धडक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

बुलढाणा. युवकाच्या हत्याप्रकरणावरून सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर धडकून हत्याप्रकरणातील आरोपीला अटकेची मागणी केली. जमावाचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनी आधी त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले. पण, विनवणी करूनही जमाव अधिकच प्रक्क्षुब्ध होत असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमाव पांगवावा लागला. या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दंगल नियंत्रण पथकासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून, सध्या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तुर्त गावात तणावपूर्ण स्थिती असली तरी पूर्ण नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

शेख आदिल शेख अकिल (१७) रा. जाफ्राबाद मोहल्ला, साखरखेर्डा असे मृताचे तर प्रशांत गवई रा. सावंगी भगत असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास या दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. यावेळी प्रशांतने आदिलचा गळा आवळला. आदिल जागेवर बेशुद्ध पडला. त्याला चिखली येथे नेत असताना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र यावर पीडित कुटुंबाचे समाधान झाले नाही. गुरुवारी दुपारी मृताचा दफनविधी पार पडला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास संतप्त नातेवाईक पोलिस ठाण्यावर धडकले. रोष वाढत असल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला.

त्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी शेख अजर शेख अफसर (३३), साजीदखान सलीमखान पठाण ( २६), शेख समीर शेख रौफ ( ३०), अजहर शेख हनिफ (२५ ), शेख सिकंदर शेख रफिक (२५), साबीर हुसेन लायक हुसेन (३२), अजीम खान शरीफखान पठाण (४०), मोहम्मद रफीक मोहम्मद शेफीक (३०), शेख अरशद शेख अफसर (२९ ), शेख सांडु शेख कादर( ४३), फैजानखान मुजमीलखान ( २४), शेख आवेश शेख शकील (२३), शेख अनिस शेख चांद (३५), शेख सोहील शेख अकील ( २१ ), मुक्तार मास्तर (४५), एजाज मास्तर (४३), अयुब कुरेशी ( ४०), शेख नइम शेख अयुम (४०), शेख शकी ( ४५), अशपाक शहा मुनीरशहा ( ४५), शेख शकील शेख शफी (४२), सर्व रा. साखरखेर्डा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला यावरून २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.