नरभक्षी टी – ६ वाघिणीने दिला ४ पिलांना जन्म

0

शावकांसह फिरताना आढळली ; जेरबंद करण्याची मोहीम तुर्त स्थगित


गडचिरोली. गडचिरोली वन विभागात (Gadchiroli Forest Division ) धुमाकूळ घालत ८ जणांचा बळी घेणाऱ्या टी ६ वाघिणीने (man-eating tigress) ४ पिलांना जन्म दिला (T6 tigress gave birth to 4 cubs ) आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही वाघीण आपल्या चार पिलांसह वन विभागाच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेली. त्यामुळे तिला जेरबंद करण्याची मोहीम काही काळ रोखण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. मात्र, त्यापाठोपाठ टी ६ वाघिणीला जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकल्याने अमरावती, ताडोबा येथील पथक गडचिरोली वनविभागातील चातगाव वन परिक्षेत्रात तैनात करण्यात आले. महिनाभरापासून हे पथक या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. अनेकदा पथकाला तिने हुलकावणीदेखील दिली.
वन विभागाचे पथक गडचिरोलीतील वनांमध्ये या वाघिणीचा शोध घेत होते. शुक्रवारी राजागाटा चेक परिसरातील जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये ही वाघीण आपल्या चार पिलांसह टिपल्या गेली. त्यामुळे वनविभागाने तिला जेरबंद करण्याची मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. चारही पिल्ले स्वस्थ असून ते पूर्णपणे आईवर अवलंबून असल्याने तूर्त तरी तिला जेरबंद करता येणार नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे.


दरम्यान, पिलांसह फिरणारी वाघीण खूप आक्रमक असते. तिच्या आसपास कुणीही आला तर ती तत्काळ हल्ला करू शकते. यामुळे चातगाव परिसतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागाने दिला आहे. सध्या या वाघिणीचा वावर राजगाटा चेक परिसरात आहे. चार दिवसांपूर्वीच एक महिलेवर तिने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत या वाघिणीने ८ जणांचा बळी घेतला आहे.


‘त्या’ बिबट्यांचा मृत्यूप विष प्रयोगाने


मेळघाट व्या्घ्र प्रकल्पा च्यात सिपना वन्य जीव विभागाअंतर्गत सेमाडोहच्यात जंगलात नर व मादी असे दोन बिबटे पाच दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात वन विभागाच्या पथकाने समाडोह येथील राजेश तायवाडे (४०) या शेळीमालकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीच्या तीन शेळ्या बिबट्यांनी मारल्या होत्या. त्याचा सूड घेण्यासाठी या शेळीमालकाने विष प्रयोग करून ३ बिबट्यांचा बळी घेतल्याचे वन विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तायवाडेने २ मृत शेळ्यांवर उंदिर मारण्या चे औषध टाकले. शेळ्या खाण्यासाठी बिबटे आले व ते विषाक्तआ मांस खाल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत झाला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा