Home Artical Blog जनगणना करण्यास नकार देणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

जनगणना करण्यास नकार देणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

0

चंद्रपूर(Chandrapur): जनगणना 2026-27 च्या कामासाठी नियुक्ती आदेश स्वीकारूनही कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेजच्या दोन शिक्षकांविरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे चार्ज जनगणना अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (प्र.) सचिन मोरेश्वर माकोडे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी म्हणून किरणकुमार पी. मोहोडे आणि प्रतीक दातार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारत सरकारच्या जनगणना 2026-27 संदर्भातील आदेशानुसार संबंधित शिक्षकांना पर्यवेक्षक/प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, शासकीय आदेश आणि नियुक्तीपत्र असूनही त्यांनी जनगणना कार्यात सहकार्य न करता काम करण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी 13 मे 2026 रोजी रात्री रामनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.