श्री पोद्दारेश्वर राम मंदिरचा शताब्दी महोत्सव 4 मार्चला 31हजार दिव्यांची आरास

0

 

नागपूर : नागपुरातील श्री पोद्दारेश्वर राम मंदिराला येत्या 4 मार्चला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भव्य स्वरूपात मंदिर स्थापना शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. . स्थापना दिनाच्या निमित्ताने 1 ते 4 मार्च दरम्यान विविध धार्मिक अनुष्ठान व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीप दर्शन सोहळा आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरणार आहे. दोन वर्षांच्या कोरोना विषयक निर्बधानंतर होणारी यावर्षीची शोभायात्रा देखील विशेष असणार आहे. दक्षिणेतील तिरुपती बालाजी मंदिर व रामेश्वरम् येथे आजही विद्युत दिव्यांऐवजी पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशातच दर्शन घेण्याची प्रथा आहे. दर्शनाचा तसाच आनंद श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातही यावेळी घेता येणार आहे. 1 मार्चला सायंकाळी 6.30 संपूर्ण मंदिर परिसरात 21 हजार दिवे प्रज्ज्वलित केले जातील. याकाळात परिसरातील सर्व दिवे मालविले जाईल. रात्री 9.30 पर्यंत अशाच वातावरणात भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. याविषयीची माहिती सोमवारी श्री पोद्दारेश्वर राममंदिर ट्रस्टतर्फे पुनीत पोद्दार यांनी पत्रपरिषदेत दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा