Home LOCAL NEWS चंद्र्कांत चन्ने यांच्या ” कारारुखाचा भोवरा ” या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

चंद्र्कांत चन्ने यांच्या ” कारारुखाचा भोवरा ” या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

0

प्रत्येक कविता एका पेक्षा एक सरस काव्यानुभव देणारी – डॉ. वि. स. जोग

नागपूर ,दिनांक २५ डिसेम्बर: रवींद्रनाथ टागोर पासून ते अगदी आजच्या काळातील हिन्दी आणि उर्दू कवि, लेखक यांचा प्रभाव असलेल्या चंद्र्कांत चन्ने यांच्या ” कारारुखाचा भोवरा ” या कविता संग्रहात प्रत्येक कविता एका पेक्षा एक सरस काव्यानुभव देणारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी केले. विदर्भ साहित्य संघ आणि विजय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने , प्रा. चंद्रकांत चन्ने यांच्या ” कारारुखाचा भोवरा “ या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात संपन्न झाला, त्यावेळी प्रकाशन केल्यावर ते बोलत होते. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग , काव्यअभ्यासक डॉ. राजेंद्र नाईकवाडे आणि दृश्यकलाकार विवेक रानडे यांनी याप्रसंगी काव्यसंग्रहावर भाष्य केले.

कवितांमध्ये हिन्दी आणि उर्दू शब्द यांचा मराठी सोबत सुंदर मिलाफ होतो असे सांगून जोग यांनी दोन ओळींचे वाचून दाखविल्या. पुस्तकात पान 1, पान 2 हे देखील रेखा चित्रातून दखविण्यात आल्याचे त्यांनी कौतुक केले. कविता संदिग्ध नाहीये, अत्यंत स्पष्ट आणि कणखर आहेत असे सांगून उत्तम शब्दप्रयोग करून महाभारतातील भीष्म, कृष्ण अश्या अनेकांवर त्यांनी लिहले आहे असे ते म्हणाले.

काव्यअभ्यासक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी चन्नेयांचे अभिनंदन करून कवितेतील अभिव्यक्ति वेगळी आहे असे ते म्हणाले. आशय केंद्राभवति फिरणारा असा हा संग्रह आहे असे ते म्हणाले.

सुरवातीला कविताकार चंद्रकांत चन्ने यांनी सांगितलं की हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. आपल्यासाठी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होणे हे अधिक सोपे असल्याचे ते म्हणाले. गुलाम शेख हे गुरु असल्याचे सांगत ते म्हणाले की जसे रंग आणि कला भावना व्यक्त करतात तसेच कविता या व्यक्त होण्यासाठी अधिक भावतात अशी कबुली त्यांनी दिली.

तत्पश्च्यात, प्रा. चंद्रकांत चन्ने यांनी आपल्याला कवितासंग्रहाचे कव्हर डिझाईन करताना संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्य देऊन आपल्यावर विश्वास ठेवल्याची भावना विवेक रानडे यांनी व्यक्त केले. चन्ने हे उत्तम चित्रकार, कला अभ्यासक असून त्यांच्यात कविता करण्याचे विचार देखील एखाद्या भोवऱ्या सारखे फिरत असावे आणि जसा भोवरा विविध दिशांना फिरतो तसेच विविधांगी विषय चन्ने यांनी कवितांच्या माध्यमातून मांडले हे लक्षातघेऊन कव्हरपेज तयार झाल्याचे ते म्हणाले.

व्यक्ति, समूह, समाज आणि निसर्ग त्यांचा परस्पर संबंध आणि त्याचा एकूणच मानवी जीवनावर होणारा परिणाम आपल्याला या कविता संग्रहातून बघायला मिळतो अश्या भावना संग्रहाला शुभेच्छा देताना विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे यशस्वी आणि प्रभावी सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी केले. मधुरा भड यांनी आभारप्रदर्शन केले. समारंभाला साहित्य रसिकांनी, मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.