औरंगाबाद ः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषीकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत आले आहेत. वन विभागातील बदलीसाठी त्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ पुढे आला (Rishikesh Khaire Audio Clip) आहे. पैसे देऊनही बदलीचे काम न झाल्याने एक युवक त्यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावत असल्याचा हा ऑडिओ असून त्यातून बदलीसाठी दोन लाख रुपये घेण्यात आल्याचे आल्याचे लक्षात येत आहे. ऑडिओत ऋषीकेश खैरे हे पैसे परत करण्याचे आश्वासन देत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पैसे घेतल्याचा प्रकार हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असावा, असे सांगण्यात येत आहे. ऋषीकेश खैरे हे हे युवासेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना वन विभागातील एका अधिकाऱ्याच्या बदलीसाठी चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी एका व्यक्तीकडून २ लाख रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ऑडिओमध्ये सदरील व्यक्ती ऋषीकेश यांच्याकडे दोन वर्ष झाली तरी बदलीचे कामही झाले नाही आणि माझे पैसेही परत मिळाले नाही असे सांगत आहे. घरातील सोने-चांदी विकून दोन लाख रुपये उभे केले होते व आपण खूप आर्थिक अडचणीत आहोत, असे तो व्यक्ती सांगत आहे. पैसे परत करण्याची एकच तारीख सांगावी व पैसे परत करावे, असे तो सांगत आहे. तर त्याला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन कथित ऋषीकेश खैरे यांच्याकडून दिले जात असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये लक्षात येत आहे.
पैसे घेतल्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे चंद्रकांत खैरेंचे चिरंजीव अडचणीत?
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा