(Mumbai)मुंबई : सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्या लोकांना न्यायालयाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालावर (CM Eknath Shinde on SC Verdict) व्यक्त करून (Uddhav Thackery) उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. निकालानतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज सत्याचा विजय झाला. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन स्थापन झाले आहे. अनेक लोक बेकायदेशीर म्हणत होते. त्यांना न्यायालयाने चपराक दिली आहे. निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण दिला. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणुक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. (Shiv Sena-BJP) शिवसेना-भाजप सोबत लढले पण दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले गेले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर न्यायालयाने केलाय, असेही ते म्हणाले.