“मी राजीनामा देऊ नका सांगायला पाहिजे होते का?”.. कोश्यारी यांचा सवाल

0

 

मुंबई (Mumbai):”मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला केवळ संसदीय पद्धती माहिती आहे. त्यावेळी मी जे काही निर्णय घेतले, ते विचारपूर्वक घेतले. माझ्याकडे कोणाचा राजीनामा आल्यावर मी तो देऊ नका, असे सांगायला पाहिजे होते का? न्यायालयाच्या निर्णयाचे विश्लेषण करणे माझं काम नाही,” अशी प्रतिक्रीया माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Former Governor Bhagatsing Koshiyari)सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिली आहे. राज्यातील शिंदे सरकारला जीवदान मिळाले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी राज्यपाल कोष्यारी म्हणाले की, “मी राज्यपाल पदावरुन मुक्त झालो आहे. याला तीन महिने झाले आहेत. राजकीय प्रकरणांपासून मी स्वतःला दूर ठेवतो. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर आपला निर्णय दिला आहे. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला केवळ संसदीय पद्धती माहिती आहेत. त्यावेळी मी जे निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले.

कोश्यारी म्हणाले की

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही. बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय? यासंदर्भात न्यायालयाने सगळं सांगितले आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही”असेही ते म्हणाले.
राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले आहे.