tanaji sawant मुख्यमंत्र्यांचा तानाजी सावंतांना धक्का, दिडशे कोटींच्या कामांना स्थगिती

0

परभणी Parabhani : परभणीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत निधीवरुन मोठा वाद निर्माण झाला असून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे शिंदे (Parbhani Guardian Minister Tanaji Sawant) गटाच्या नेत्यांना डावलून भाजप आणि विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना अधिकचा निधी देत असल्याच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांनी मंजूर केलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देत सावंतांना मोठा धक्का दिला. त्यामुळे आता सावंत अडचणीत आले असल्याची माहिती आहे. shinde शिवसेनेचा पालकमंत्री असताना शिवसेनेला वगळून विरोधी पक्षांसह भाजपला सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीद्वारे ही कामे मंजूर केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोनवरून ही कामे काही दिवस थांबवण्याचे आदेश दिलेत. तसेच यावर तोडगा काढून निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्वतः जिल्हाधिकारी गावडे यांना सांगितले. पालकमंत्री तानाजी सावंतांना हा मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तानाजी सावंत यांनी त्यांच्याच पक्षावर अन्याय केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी केला आहे.