Home Artical Blog झाडावर चढा… आंबे खा… निसर्गाशी नाते जोडा…

झाडावर चढा… आंबे खा… निसर्गाशी नाते जोडा…

0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त चेरी फार्ममध्‍ये 5 तारखेपासून व‍िव‍िध उपक्रम ‍

नागपूर (Nagpur), 3 जून :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कॅम्प चेरी फार्म, रामटेक येथे 5, 6 आणि 7 जून दरम्‍यान झाडांवर चढणे, आंबा खाण्याची मजा, निसर्गभ्रमण, आणि संवेदनात्मक शिक्षण अनुभव अशा विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून निसर्गाशी नाते जोडण्‍याची संधी मुलांना मिळणार आहे.
मुलांनी निसर्गाशी पुन्हा जवळीक साधावी, स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ कमी करावा आणि प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरणाविषयीची जाणीव व प्रेम वाढवावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली मुलांना झाडांवर चढण्याचा अनुभव घेता येईल, ताज्या आंब्यांचा आस्वाद घेता येईल, परिसरातील निसर्गाचे निरीक्षण करता येईल आणि पर्यावरणाविषयी संवादात्मक पद्धतीने शिकता येईल. पालकांनी आपल्या मुलांची या कार्यक्रमासाठी नोंदणी करावी व निसर्गाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी द्यावी, असे आवाहन सीएसी ऑलराऊंडरतर्फे करण्‍यात आले आहे.