अकोला : अकोल्यातील जुने शहर परिसरात दोन गटात झालेल्या वादानंतर एकाचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले .सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर हा वाद झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दंगलग्रस्त भागात पाहणी केली.या घटनेतील मृतक विलास गायकवाड यांच्या घरी जाऊन भेट दिली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या घरी देखील पटोले यांनी भेट दिली आणि दोषींवर नक्कीच कारवाई होईल असे आश्वासन यावेळी पटोले यांनी दिले.
विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांची नाना पाटोले यांनी घेतली भेट
अकोला : अकोला शहरामध्ये 13 मे च्या रात्रीला सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटात राडा होऊन दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यामध्ये लाईनमन असलेले विलास गायकवाड हे घरी जाताना दगडफेकीत विलास गायकवाड यांना दगड लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.मृत विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली.














