नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकने 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोकांना त्यांच्याजवळील 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. एका वेळी 10 नोटा म्हणजे 20 हजार रुपये म्हणजेच जमा करता येणार आहेत. परंतु 2 हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत 2 हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय.
2 हजारच्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन 500 आणि 2 हजारच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर 2016 मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने 2019पासून 2 हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती.