Home Top News लक्षवेधीत अनुपस्थित, नाना पटालेंवर बच्चू कडूंची टीका

लक्षवेधीत अनुपस्थित, नाना पटालेंवर बच्चू कडूंची टीका

0

 

नागपूर: नवी मुंबइतील तळोजा, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर, खारघर, जुई नगर रेल्वेस्टेशन येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या प्रदुषणावर एक लक्षवेधी नाना पटोले यांनी उपस्थित केली होती. मात्र तेच अनुपस्थित राहिल्याने बच्चू कडू यांनी नाना पटोलेंवर जोरदार हल्ला चढवला. सभागृह नियमित वेळेत सुरू झाल्यानंतर नाना पटोले यांनी सभागृहात येऊन त्यावर आक्षेप नोंदवला.

खरे म्हणजे विदर्भातील माणसाने विदर्भातील प्रश्न लावायला पाहिजे. अनेकांच्या लक्षवेधी लागत नाही. त्यासाठी किती खटाटोप करावा लागतो हे सभागृहाला माहित आहे. नाना पटोले अध्यक्षांना भेटले असतील म्हणून खास बाब म्हणून लक्षवेधी लावली. आता तेच गैरहजर राहिले. नाना पटोले गैरहजर का राहिले याची चौकशी करून माहिती पटलावर ठेवावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनीही लक्षावेधीसाठी दहा दहा वेळा अध्यक्षांना विनंती करावी लागते. ते अनुपस्थित राहिल्याने नाना पटोले यांच्या प्रतिमेवर संशय निर्माण झाला आहे. लक्षवेधी लावून अनुपस्थित राहाणाऱ्या सदस्यांना काळ्या यादीत टाका. अधिवेशन संपतानाही विदर्भ कुठेच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावातही विदर्भ नाही असे जयस्वाल म्हणाले. त्यावर तालिका अध्यक्षांनी अध्यक्षांशी बोलून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.
सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच नाना पटोले यांनी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणे चांगले नाही. कोण सेटींगबाज आहे हे मलाही माहिती आहे. गेली अनेक वर्ष मी सभागृहाचा सदस्य आहे, अशी नाराजी व्यक्त केली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्याबद्दल हेतुपुरस्सर कोणी आरोप केला असेल तर तपासून रेकाॅर्ड वरून काढून टाकण्यात येईल असे जाहीर केले. त्या नंतर या वादावर पडदा पडला.