यवतमाळ : पोटच्या पोराची आईसह कुटुंबीयांनी 5 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची गंभीर घटना आज उघडकीस आली असून या प्रकरणी लोहारा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांसह सहा जणांना अटक केली. अवघ्या काही तासात हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले .योगेश विजय देशपांडे (28) रा. नेरपिंगली, ता. मोर्शी असे मृताचे नाव आहे. स्वतः आरोपी विकी भगत याने चौसाळा जंगलात एक अनोळखी इसमाचे प्रेत असल्याबाबत 112 वर कॉल करून माहिती दिली. अनोळखी प्रेताची पाहणी करीत असताना प् त्याच्यावर संशय आल्याने आरोपीस ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला.मृतकाची आई वंदना विजय देशमुख हिने मृतकाचे मोठे वडील मनोहर चौधरी रा. देविनगर लोहारा यांचे घरी मोठी आई उषा व चुलत भाऊ लखन, मोठे वडील यांचे समक्ष खुनाचा कट रचून आरोपी विकी भगत व राहुल पडाले यांना पाच लाख रुपयाची बोलणी करून नगदी दोन हजार रुपये देवून मृतक मुलगा योगेश चौसळा जंगलात नेवून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादी प्रपुल उत्तमराव वानखेडे यांचे तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी विविध कलमाने गुन्हे दाखल करीत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.