नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के भरपाई द्या- रविकांत तुपकर

0

 

बुलढाणा : नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिछा सोडायला तयार नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.घरांची, गोठ्यांची पडझड झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.. तात्काळ शेतकऱ्यांना मदत न केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करू असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.