मुंबई Mumbai – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगात असलेल्या कैद्यांसोबत संपर्क साधला जात असून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा राऊत यांनी केला. यासंदर्भातील पुरावे आपल्याकडे असून ते लवकरच जाहीर केले जातील, असेही त्यांनी सांगितले. राऊत यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि BJP भाजपवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कलंक शब्दाचा उल्लेख केला.
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. राऊत म्हणाले की, एकेकाळी सर्वांचे बॉस असलेले फडणवीस त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या मंत्र्याच्या हाताखाली आता काम करत आहेत. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. या सर्वातून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, असेही ते म्हणाले.