नवी दिल्ली New Delhi – गुजरात उच्च न्यायालयाने Gujarat High Court काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांची मोदी अडनावासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. आता राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कॅव्हेट दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी याचिका दाखल केल्यास आपली बाजुही ऐकून घेण्यात यावी, असे पुर्णेश मोदी यांनी अर्जात नमूद केले आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनावाचा उल्लेख Mention of Modi surname करत केलेल्या टीकेबद्दल 2019 च्या मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शक्षा सुनावण्यात आली आहे. या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने अलिकडेच नकार दिला आहे.
राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास त्यांची बाजूही ऐकून घेतली जावी, असे पूर्णेश मोदी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. दरम्यान, या मानहानी खटल्यात शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे