Home entertainment कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमात सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद ?

कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमात सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद ?

0

मुंबई(Mumbai)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील महान कलाकार राज कपूर(Raj kapoor) यांच्या १०० व्या बर्थडेसाठी निमित्त शुक्रवारी रात्री मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं होतं.१३ ते १५ डिसेंबरदरम्यान राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचंही आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमात रेड कार्पेटवरच सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री करीना कपूरसोबत तिचा पती अभिनेता सैफ अली खानदेखील या सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी दोघांचा रॉयल लूक पाहायला मिळाला. रेड कार्पेटवर संपूर्ण कपूर कुटुंबीय फोटोसाठी एकत्र पोझ देत होते, त्याचवेळी सैफ आणि रणबीर यांच्यात काही वाद झाला.सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतेय की, जेव्हा रणबीर कपूर सैफ अली खानला स्क्रिनिंगकडे जाण्याबद्दल सांगत असतो, तेव्हा सैफ थोडासा चिडलेला दिसत होता. सैफ कठोर स्वरात रणबीरला ‘ओके’ असे म्हणताना दिसतोय. दोघांमध्ये काही वाद झाला की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

कपूर कुटुंबीयांच्या या खास कार्यक्रमात सैफ त्याची पत्नी करीना कपूरसोबत पोहोचला होता. याशिवाय कार्यक्रमाला आलिया भट्ट, रणधीर कपूर, बबिता, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, करिश्मा कपूर यांचीही उपस्थिती होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महेश भट्ट, रेखा, कार्तिक आर्यन, शर्वरी वाघ, संजय लीला भन्साळी, फरहान अख्तर, पद्मिनी कोल्हापुरे, विकी कौशल, बोनी कपूर, सोनी राजदान, बॉबी देओल, शाहीन भट्टसह इतरही अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी होती. कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांच्या जनशताब्दी सोहळ्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिलं होतं. यावेळी करिश्मा, करीना, सैफ, रणबीर, आलिया, नीतू हे सर्वजण दिल्लीला मोदींच्या भेटीला गेले होते.