नवी दिल्ली :(new delhi) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (MP Brij Bhushan Singh) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मात्र तरीही आंदोलक(Movement of women wrestlers) महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलन करणारे पैलवान जर आंदोलन थांबवणार असतील तर मी राजीनामा देईन, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझ्याविरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. त्या निर्णयावरही मी खूश असल्याचे बृजभूषण म्हणाले आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध एका एफआयआरमध्ये अल्पवयीन कुस्तीपट्टूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींचा समावेश आहे.
बृजभूषण शरण सिंह यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपण चौकशीचा सामना करण्यासाठी मी तयार असून तपास संस्थांना सहकार्य करेन. माझा न्यायसंस्थेवर विश्वास आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण मी गुन्हेगार नाही. मी राजीनाा दिला तर मी कुस्तीपट्टूंच्या आरोपांना मान्य केले असा त्याचा अर्थ होईल. माझा कार्यकाळ जवळपास संपला आहे. सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केलीय आणि ४५ दिवसात निवडणूक झाल्यानंतर माझा कार्यकाळ संपेल, असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, कुस्तीपटू दर दिवशी नवी मागणी समोर आणत आहेत. त्यांनी एफआयआरची मागणी केली त्यानंतर आता मला तुरुंगात पाठवावे आणि सर्व पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ते करीत आहेत. मी माझ्या मतदारसंघातून लोकांमुळे खासदार आहे. विनेश फोगाटमुळे खासदार नाही झालोय. फक्त एका कुटुंबातील सदस्य आणि त्यांचा आखाडा माझा विरोध करतोय. हरयाणातील ९० टक्के खेळाडू माझ्यासोबत आहेत. त्यांनी १२ वर्षांपासून कोणत्याही पोलिस स्टेशनला, क्रीडा मंत्रायलयाकडे किंवा महासंघाकडे तक्रार नाही केली, असेही ते म्हणाले.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत . हे सर्व अधिकारी ACP ला रिपोर्ट करतील आणि नंतर ACP – DCP ला रिपोर्ट करतील. एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे 10 पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली पोलिस तपासासाठी परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे. जिथे पीडित कुस्तीपटूसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यात जिथे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे तिथे पोलीस देखील पोलीस जाण्याची शक्यता आहे. पीडित कुस्तीपटूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर असेल.
सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार
एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार आहेत.