रत्नागिरीः रत्नागिरीतील बारसू येथे 224 परप्रांतियांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यातील 20, 22 परप्रांतियांची आडनावे मोदी व शहा आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी प्रकल्पाबाबत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. अरविंद सावंत म्हणाले, बारसू येथे स्थानिकांची फसवणूक झाली आहे. प्रकल्प येणार हे आधीच माहित असल्याने अगदी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मिरपर्यंतच्या भू-माफियांनी येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. तब्बल 224 परप्रांतिय भूमाफियांनी बारसूत जमिनी खरेदी केल्या आहेत. यातील 20 ते 22 जणांची आडनावे मोदी व शहा आहेत, असे ते म्हणाले. माजी आमदार व काँग्रेसचे निलंबित नेते (Ashish Deshmukh)आशीष देशमुख यांनीही बारसूमध्ये १८ एकर जमिन खरेदी करून ठेवल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. तर ही जमीन शेती करण्यासाठी खरेदी केली असा दावा देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय.
राऊत यांनी सांगितले की, नाणार येथेही भूमाफियांनी अशाच पद्धतीने जमिनी खरेदी केल्या आहेत. लाखोंमध्ये जमिनी खरेदी करून कोटी रुपये कमावण्याचे हे धंदे आहेत. मात्र, नाणारमधून रिफायनरी जाणार असल्याने तेथे जमिनी घेतलेले भूमाफिया नाणारमध्येच प्रकल्प व्हावा, म्हणून सरकारवर दबाव आणत आहेत. तर, प्रकल्प बारसूत व्हावा, असा जोर बारसूत जमिन खरेदी केलेले भूमाफिया लावत आहेत. या कारणामुळे आता भू-माफियांमध्येच वाद निर्माण झाला आहे, असा दावा त्यांनी केला.
तो दावा खोटा
दरम्यान, मुख्यमंत्री (EKNATH SHINDE)एकनाथ शिंदे यांनी(BARSU)बारसू येथे आंदोलकांवर लाठीमार झालाच नाही, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दावा(VINAYAK RAUT) विनायक राऊत यांनी फेटाळून लावला आहे. बारसूतील अनेक स्थानिकांनी माझे बोलणे झाले. त्यांनी आपल्यावर लाठीमार झाल्याचे सांगितले आहे.
पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117