मुंबई MUMBAI शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता ३ ऑगस्टपर्यंत विमा (Crop Insurance) भरता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पीक विमा काढण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले.Crop insurance deadline extended, today was the last day
कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. ती आता 3 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात काही भागात अतिशय कमी पाऊस झाला असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्यांना सहभागी होता येणार नसल्याने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकर्यांना सहभागी होण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी करत होते.