मुंबई MUMBAI – राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर एक याचिका नव्याने दाखल झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २१ ऑगस्ट पूर्वी याविषयी आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रकरणी सोमवारी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.New petition in court on the issue of MLAs appointed by Governor